Some work was never meant to be finished.
It remains — quietly, honestly —
long after the hands are gone.
This space preserves illustrations, paper cutouts, and stories —
drawn in black and white, shaped in paper, and written in silence —
Not as nostalgia.
But as lines that continue to speak.
The Lines
Illustrations • Paper • Stories
Black and White Illustrations
Ink on paper. Observation over decoration.






















Paper Cutouts
Form reduced to intent












Diwali (Ank) Specials, September - 1984






Short Stories
Written without urgency. Read without haste.




Sugi
Sugi is an award-winning short story written by Papa in September 1984 for a Diwali special. Set in a deeply rural world, the story reflects a time when village life, human relationships, and the quiet presence of women shaped everyday thought and reading.
The story unfolds through the eyes of a young boy who lives with his elder and younger siblings. In their village lives Sugi—a woman known for her rare beauty, gentle nature, and soft-spoken dignity. She is kind to everyone, especially to the boy, whom she adores. She speaks to him warmly, treats him with affection, and becomes a comforting presence in his simple world. To the boy, nothing about her ever feels wrong.
His father, a shopkeeper, sometimes visits Sugi’s house in the evenings. Before leaving, he asks the boy to carry a message to his mother—that he will return late after visiting the temple or meeting friends once the shop is closed. In a village, however, little remains hidden. The mother already knows the truth.
One evening, she takes the boy with her and walks straight to Sugi’s house, fully aware that her husband is there. What follows shatters the boy’s innocent understanding of the world. His mother publicly insults Sugi, calling her immoral. The father, in a sudden burst of rage, slaps his wife hard and storms out of Sugi’s house with his family.
Sugi is left wounded—silently, deeply.
After this incident, the mother takes everything to heart. Though the father insists he has stopped visiting Sugi, the damage has already been done. The mother’s health begins to fail. Slowly, she becomes bedridden. The house loses its rhythm. The boy and his father struggle to manage the home, the chores, the children—but something essential is missing. The warmth, the order, the sanctity of the household fades. Everything begins to fall apart.
Then, one day, Sugi arrives at their doorstep.
Without resentment, without accusation, she steps into the broken household. She bathes the children, cleans the house, washes clothes, cooks meals, and gently feeds the ailing mother nourishing food. She takes over the care of the family as if it were her own. The mother, burdened by guilt and pride, initially treats Sugi coldly. But Sugi never stops serving—quietly, patiently, with unwavering dignity.
Months pass. Slowly, the mother recovers.
One day, Sugi announces that the mother is well now—and that she will be leaving the village forever. The news leaves the household heavy with grief.
On the final night before Sugi’s departure, something extraordinary happens. The mother turns to her husband and tells him that a neighboring house is being vacated. She asks him to take that house for Sugi—to help her settle there. She says Sugi has no one, that she is too good, too restrained, too patient, too gentle, and possessed of rare decorum. She says Sugi deserves to stay close—as their neighbor.
The father is stunned.
The boy is overwhelmed with joy.
And in that quiet village night, the meaning of forgiveness, humanity, and silent strength finally reveals itself.
Curator’s Note
Written in September 1984, Sugi reflects a rural world where lives unfold in close proximity and little remains hidden. Yet the story’s power does not come from exposure—it comes from restraint. Told through a child’s eyes, it refuses judgment and allows human behavior to reveal itself slowly, through action, silence, and consequence. At its center stands Sugi, a woman whose dignity, patience, and quiet service reshape an entire household without a single demand. Decades later, the story endures not as a commentary on morality, but as a reminder that true strength often speaks the softest—and stays the longest.
Legacy Framing Note
Sugi was written in 1984, in a time when stories carried responsibility—not noise. Rooted in rural life and told through the quiet honesty of a child’s gaze, the story reflects a world where character was revealed not through declarations, but through endurance. Sugi’s presence in the narrative is not symbolic; it is lived—measured in care given, dignity preserved, and pain absorbed without spectacle. This story stands today as part of a larger inheritance: a way of seeing people with empathy, of trusting silence, and of believing that grace can restore what conflict breaks. In preserving Sugi, we preserve not just a story, but a moral temperament shaped by its time and still relevant to ours.
रातीचे टोल पडत व्हते. येक दोण तीण च्यार पाच… पुड आईला मोजता येईना. तिनी मला इचारलं, ‘किती वाजलं रं?’ मी बी टोल मोजत व्हतो. तिनी मधीच इचारल्याण माजबी चुकलं. पण म्या बी दिल ठोकून ‘आकरा’
आईनी तोंडाला बोट लावीत इचारलं, ‘काय? आकरा?’ आजून पत्ता नाई. येचा म्हंजी माझ्या बा चा.
मी इचारलं, ‘आये, एवढ्या रातच्याला दादा कुटं गेला आसल ग?’ आई
फनकार्यांनं म्हणाली, ‘गेला आसल त्या रांडा-कड!’
म्या इचारलं, ‘कोन ग ती रांड ?’ ती म्हणाली, ‘तुला काय करायचं?’ झोप मुकाट्यानं.
पन माला ठाव व्हतं! रांड म्हंजी कोन ती. सुगंदाबाईची आण माझ्या दादाची लै दोसती व्हती. सबावाण मायाळू व्हती. दिसाया तर आशी, का जशी शिनीमातली नटी. ती माज लै लाड करायची. खाऊला पैसं द्यायची. माला
शाळंला बुकं घिऊन द्यायची. एखाद्या दिशी सांगायची, ' इसिनात तुझ्या बा ला म्हणावं, म्या रातच्याला बोलवलं.
पण तुझ्या आयला कळू देऊ नोको बरं का. मग मी म्हणायचो 'नाय' मग मी बाजारात जाऊन दादाच्या दुकाना पुढं उबा राहून म्हणाचो, दादा, तुला रातच्याला सुगंदाबाईनं बोलवलं. आजूबाजूचे दुकानदार हसायचे. दादा म्हणायचा, 'ए भडव्या चूप!'
च्यायला, सुगीचा निरूप सांगतल्यावर दादा माज्यावर का भडकायचा, माला समजत नवत. दादाच्या दुकानाशेजारी मुरल्या वंजार्यांचं दुकान व्हतं. तो म्हणायचा, बाप्या, त्या लेकरावर कायसा डाफरतो? ते बिचार निरूप सांगतं तर, जाय रातच्याला, तुज्या प्यारिला भेटाया. 'प्यारी' म्हणताना, मुरल्या दादाला डोळा मारायचा.
माजा दादा गालातल्यागालात हासत, च्यार पैसे माज्याकड फेकाचा आन म्हणाचा 'इशा हे घे, पळ घरी. पन तुझ्या आईला सांगू नोको, माला सुगीनं बोलवलं ते.' मी ''व्हय ', म्हणून पैसे घेऊन सटकायचो, पन दादा मला परत बलावून म्हणाचा, 'इशा तुज्या आयला म्हणावं रातच्याला दादा चिरुबाच्या देवळात भजान कराया जानार हाये. वाट पाहू नोको. तुजी तू भाकर खाऊन घे.'
आज बी दादाचा असाच निरूप व्हता, पन म्या आयला सांगितला नवता.
आई हांथरुनावर बसली व्हती. मी तिच्या मांडीवर डोकं ठिवून पडलो व्हतो. शेजारी माजा लाना भाऊ बारक्या झोपला व्हता. मोटा भाऊ आभ्यासाला जोश्याच्या वाड्यावर गेला व्हता. झोपातला बारक्या
उटून बसला. रडाया लागला. तवा आई म्हणाली, 'मुतला वाटत हा' आईनी त्येच्या आंगाखाली कोरडं फडक घातलं. बारक्या पूना झोपला. त्याला थापटीत ती मला म्हणाली, ‘इसीनात रातच्याला तु बी मुतला व्हता बरं का हांतरूनात.'
आईचा बोलण्यानं माझं लै मरुन पाणी झालं. मी म्हणलं, ‘मी नई हाच मुतला व्हता.’
आई म्हणाली ‘शाजुकी करु नोको.’
थोड्या येळाने आई म्हणाली ‘इसीनात!’
मी म्हणलं ‘काय ग आये?’
ती म्हणाली, ‘तुज्या दादानं काय सांगितलं बिगितलं व्हतं का?’
‘कशा बद्दल म्हणती?’ मी तिला इचारल.
‘अरे, रातच्याला कुटं जानार व्हते का ते?’
‘माला नै माहित,’ मी म्हणलो.
तवा ती लै चिडली आनं म्हणाली, ‘मेल्या, काळतोंड्या, तुला ठाव आसतं, पन तु बोलनार नाई माला ठाव हाये. तु पन बापावानी बनेल हायेस.’
मी दादाला सुगीचे निरुप सांगतो हे आईला ठाव व्हतं.
ती कावून म्हणाली, ‘मरा मेल्यांनो, उद्या तो (म्हंजे माझा बा) तिला आणून ठीवील घरात, आन आपल्या सौंसाराच वाटूळं करील, तवा तुमचे डोळे उघडतील.’
आई बिचारी लै तळतळून बोलत व्हती.
माला बी लै वाईट वाटलं.
पन सुगंदबे लै चांगली व्हती. एवढी चांगली बाई घरात ‘ठीवून’ घेत ल्यानं, संसाराचं वाटुळ
कसं हुईल हे माला समजना.
मी म्हणालो, ‘आई ईद्देची शपत माला काय बी ठाव नाई, दादा कुठं गेला ते.'
आई बिचारी लै तळतळून बोलत व्हती. ईद्देची
माला बी लै वाईट वाटलं.
पन सुगंदबे लै चांगली व्हती. एवढी चांगली बाई घरात ‘ठीवून’ घेत ल्यानं, संसाराचं वाटुळ
कसं हुईल हे माला समजना.
मी म्हणालो, ‘आई ईद्देची शपत माला काय बी ठाव नाई, दादा कुठं गेला ते.'
‘तुला नाई, पन माला ठाव हाये ना,’ असं म्हणून आई ताडकन उठून उबी रायली. आन मला म्हणाली, “चाल माझ्या बरुबर!”
मी विचारलं कूट? तर म्हणाली, ‘म्हसनात!’
तिनं दाराला कढी लावली आन शेजारच्या ठकू आत्याला म्हणाली, ‘वन्स, जरा नजर राहू द्या इकडं, मी आता येते. बारक्या झोपेल हाये.’
आई मला कुठं घेऊन जानार हे मला ठाव व्हतं. सारं गाव अंधारात घोंगडं पांघरलेल्या म्हाताऱ्या सारखं पडून व्हतं. आमी सुगंदाबाईच्या घराकडं चाललो व्हतो. तीच घर थेट गावाच्या त्या टोकाला व्हतं!
आई झपाट्यानं चालली व्हती. तिच्या मागं पळत, धडपडत मी धावत व्हतो.
गांदिचौक वलांडून आमी पुड गेलो.
सुगीच्या घरात बत्ती जळत व्हती.
आम्ही घराजवळ गेलो तवा दादाच्या हसण्याचा आवाज येत व्हता.
आई म्हणाली, ‘जाय बोलव तुझ्या दादाला.’
मी घरात घुसलो. आई भायरच उबी व्हती. सुगी चुलीजवळ बसून आंड्याच्या पोळ्या करीत व्हती.
लै मस्त वास सुटला व्हता. आंड्याच्या पोळ्या मला लै आवडत व्हत्या.
दादा आन सुगीनं माला पायलं. ते दोगबी चाट पडले.
दादा मला म्हणाला, 'इशा एवढ्या रातच्याला कसा आला?'
मी म्हणलं, 'आई भायेर उबी हाय.'
आईचं नाव काडल्यावर दादा लय टरकला. त्याचं तोंड जोडा मारल्यावानी झालं.
तो म्हणला, 'सुगे निगतो मी.'
तवा सुगी म्हणाली, 'थांबा थोडं, एवडी आंड्याची पोळी खाऊन जा.'
मला सुगीच बोलणं लई पटलं. मी तिच्याजवळ जाऊन बसलो. तिने मला भाकर आण आंड्याची पोळी दिली. मी खायला सुर्वात केली, पण दादा, आय माझ्या बरुबर आल्यानं लई भेदरला व्हता, तो म्हणला, 'राहू दे तुझ्या पोळ्या. ही बया आली हितपर्यंत- आता घरी लई कहर व्हईल.
सुगी लगबगीने उठली, आन दारात जाऊन आईला म्हणली, 'आवो वयनी, या ना घरात.'
आई दारात येऊन उबी रायली आन म्हणाली- भवाने माला वयनी म्हणते? आन हा तुझा भाऊ आहे का? अगं खेळवणी, झाला एवढा खेळ पूरं झाला. याच्या फूड तू आन माझा नवरा, आसे एका जागी पाहिले ना- तर तुझी झिट्टी पायाखाली घालीन, ध्यानात ठीव.'
आई लई चिडली व्हती.
सुगी बिचारी चिमणी वाणी तोंड करून गप राहिली.
दादा आईला म्हणाला, 'चाल घरी नोको तमाशा करू. लोक नाव ठीवतील.
आई म्हणाली, 'मी बोलले तर लोक नाव ठीवत्याल नाही का? आन घरची लकशीमी, पोरं, सोरं सोडून इत रांडाच्या घरी बसल्यान लई कीरती व्हती व्हय?'
दादा नं आईच्या मुस्कटात ठेवून दिली.
बिचारी आई हातांनी तोंड झाकून रडत बोंबलत घराकडे पळत गेली.
सुगीच्या डोळ्यात बी पाणी आलं! ती म्हणाली, 'बापूराव, तुमी इनाकारण वयनीला मारलं, आस नोको व्होतं करायला.'
दादा काही बोलला नाही माझ्याबाकोटीला धरून तो घराकडे निघाला.
सुगीच आणि दादाचं लफडं आईच्या मनाला लै लागलं व्हतं.
ती दिवसेंदिवस झटकत चालली व्हती, दिवसेंदिवस सुकत चालली व्हती. गालफडं पार बसली व्हती.
दादा जरी आसा व्हता तरी त्याचा पण आईवर लई जीव व्हता. तो तिला गंज सांगाचा, 'भागीरते मी सुगीचा नाद सोडला, तू उगाच झुरत बसू नोको. तू आसं कराया लागली तर लेकरं उघडी पडतील.' पण आईला ठाव व्हता दादाचा सुगीचा नाद सुटला नाय, तिला तो गंज ठाव व्हता, आपल्या नवऱ्याचा आपल्यावर पण लय जीव हाये. पण बाई माणसाची जातच लै मच्छरी आसते. आपला नवरा कोण्या बाईच्या नादी लागला तर त्यांना लै राग येतो.
त्या नौऱ्याचे धा गुने माफ करतील. पण आसं वागणं कदीबी सहेन करनार नाई.
शेवटी व्हायाचं तेच झालं. आई ईचार करून करून - दादाचं वागणं पाहून लै आजारी पडली.
तिच्याकडे पाव ना अशी भेसूर दिसाया लागली.
तिला हातुरणावरून उटून सैपाक पाणी करणं मुश्किल झालं.
दादा आवशद पाणी करीत व्हता, काही 'बाहेरचं', 'भुताकुताचं,' हाय का म्हणून भगताच्या वाऱ्यात दावीत व्हता. पन आईला गुन येईना.
माजा मोठा भाऊ सौपाक पानी करीत व्हता. कसं तरी घर आवरत व्हता. त्येची परीकशा आली व्हती. बारक्याची, माझी लई आबाळ व्हत व्हती.
एक दिवशी सुगी घरी आली आईजवळ बसली म्हणली, 'वयनी माझ्या आन बाबुरावांच्या ईषयी सोंशय येत आसल तर मणातून काढून टाका.
तुमच्या पायाची शफत मी त्यांना भेटत नाही- बोलत नाही'
आई काही बोलली नाही.
बिचारी सुगी उठली आन घरात आवर सावर कराया लागली. साऱ्या घरात भंनक माजलं व्हतं. सुगीन घर झाडलं. सारं जिथल्या तिथं ठेवलं. बारक्याला, माला आंघुळ घातली. सैपाक करून आमाला वाडलं. आम्ही जेवाण करून साळाला गेलो.
सांजच्याला आमी साळातून आलो तरी सुगी घरातच व्हती. चुलीजवळ भाकरी करीत बसली व्हती. तिला पाहून माला लय आनंद झाला. ती दिवसभर आईची शेवा करीत बसली व्हती. आवशद पाणी देत व्हती. बारक्याला सांभाळीत व्हती. रातच्याला दादा दुकान आटपून घरी आला. सुगीला घरात पाहून तो चाटच झाला. ती दिवसभर इत घरात हाये हे कळल्यावर त्याला काय बोलावं सूचाना.
सुगीनं दादाला, आमाला वाडून दिला- आमचं जेवण झाल्यावर तिने आईला बळबळ उटवून तिला भात तूप खाऊ घातला. आवर सावर करून घरी जया निघाली तवा दादानं इचारलं- तू नै जेवली!
ती काई न बोलता जाया निगाली तवा बारक्या तिला बिलगत म्हणला- सुगे जाऊ नोको. जेवाण कर अन इथच राय. आम्ही सगळ्यांनी आग्रेव केला तवा ती दोन घास जेवली. दादा तिला सोडाया निघाला तवा ती म्हणली- तुमि नका येऊ- इशिनात येईल माज्या सोबतीला. तुमी इत बसा वयनी जवळ!
मी तिच्या बरुबर तिच्या घरी गेलो. रातच्याला तिच्या पुडे झोपलो. ती माझे केस कुरवळत व्हती. माला झोप लागून गेली. सकाळी पुना आमच्या घरी आली.
सुगी रोज काम करत व्हती. आईची सेवा, आवशद-पानी- आमचं खानं - पिनं- घर आवरनं- लै झटत व्हती. ती याया लागल्यापासून घर कस चाक राहत व्हतं. हळूहळू आईची तब्येत सूदराया लागली. तिच्या तोंडावर नूर याया लागला. हे सार सुगीच्या शेवेने झालं व्हतं.
पण आई तिच्याबरुबर शबदभर बोलत नव्हती.सुगीच्या प्रेमळ पणान साऱ्या घराला तिचा लळा लागला व्हता, पण आईची आडी सुटत नव्हती. सुगी म्हणाची, 'वयनी काही मनात आणू नका. आता तुमाला बरं वाटाया लागल. दोन-चार दिसात मी गाव सोडून जाणार हाये. माझ्यामूळ तुमच्या संसारात इचका नोको व्हायाला.'
खरं म्हणलं तर आईला पण समजत व्हता सुगी आपल्यासाठी, आपल्या पोरा बाळासाठी, नवऱ्यासाठी किती किती जीव काढते ते. घर कसं निर्मळ ठीवती. आपण वाकड वागलो तरी आपली शेवा औषध पाणी कसं मन लावून करते. सुगीच्या सेवेने आपण मरणाच्या दारातून परत आलो हे तिला समजत व्हतं.
आमाला तर वाटत व्हतं सुगी कधीच जाऊ नाही. आपल्या घरात- तिने हमेशा हितच राहावं. तिन गाव सोडून जायची गोष्ट काढली तेव्हा आम्ही पोरं तर रडायाच लागलो. तिची इनवणी करून आम्ही म्हणालो, 'सुगे तू आम्हाला सोडून दुसऱ्या गावाला जाऊ नोको.' ती पण आमचं मन राखत म्हनाली, 'नै जायाची बरं बाळांनो.'
सुगीला मायेच कोणी नव्हतं. ना पोर, ना बाळ- आई ना बा. नौरा मरून गेला व्हता. ही इदवा बाई बिचारी, भाजी-पाला इकूण एकली रायची. तरीबी तिच्या अंगावर लय दागिने व्हते. दिसाया तिच्यावानी बाई अख्या गावात नव्हती. एवढ्या नंबरी बाईची आणि माझ्या बा ची दोसती व्हती याचा मला लय अभिमान वाटत व्हता. एवडी शान बाई आपल्या आईसाठी गाव सोडून जाणार म्हणल्यावर आम्हाला लय वाईट वाटला. एकदा सुगी बारक्याला बाहेर खेळवत व्हती.
आई हाळू-हाळू घरातलं काम करीत व्हती. मी आणि माझा मोठा भाऊ आईला म्हणालो 'आई सुगीला नोको ना जाऊ देऊ गाव सोडून. तिला बिचारीला कोणीबी नाही ती किती चांगली आहे. तिने तुझं आमचं किती केलं महिनाभर. कोण आपल्यासाठी एवढ्या खस्ता खाणार आहे?' आई काही बोलली नाहि. आमाला तिचा लै राग आला. मी म्हणलं तुझ्यापेक्षा ती आमची आई असती तर बरं झालं असतं.'
तेव्हा ती म्हणाली, 'सांग तुझ्या बापाला तिला ठेवून घ्या म्हणावं. माझी मी जाते कुठे बी निघून. रहा तुम्ही मजेत.'
आई वैतागून बोलत व्हती पण हळूहळू गालात हसत बी व्हती.
रातच्याला जेवण करून आम्ही भाऊ हातुरनावर पडलो व्हतो. मोठा, बारक्या झोपले व्हते. मी मात्र जागाच व्हतो. दादाच जेवण झाल्यावर आई अन सुगी जेवल्या. सुगी आवराया लागली तवा आई तिला म्हणाली, 'जा बाई तू गंज रात झाली. माझी मी घेते आवरून.'
मग दादाला आई म्हणाली, 'जा, वो, सोडून या तिला घरी.'
दादा म्हणाला, 'मी नै जात. इसनात जातो रोज. त्याला उठव.'
दादानी मला हाक मारली, पण मी गुच्याप पडून राहिलो. मग आई म्हणाली, ' आवो जा तुम्ही, तो झोपला.'
दादा सुगीला सोडाया गेला आन लागोलाग घरी येऊन हांतुरनावर पडला.
आई म्हणाली, 'अव् ऐकलं का'
'काय म्हणती ?' दादा.
'आपल्या शेजारची ठकू आता चालली तिच्या लेकीकडे रायला.' आई.
'मग?' दादा.
'तिची जागा रिकामी व्हईल,' आई.
'आपल्याला काय करायची तिची जागा ?' दादा तुटकपणाला बोलला.
' सुगंदाबाई साटी घ्या,' आईनं सुचवलं. तसं दादा उठून बसला न म्हणला, 'कशाला ? ती जानार आहे परवा संगमनेरला. राहाणार हाये ती.'
जरा वेळ गप बसून आई म्हणाली तिला म्हणावं तुला तुज्या वयनीची शपत आहे गाव सोडून जाऊ नोको. राहील बिचारी आपल्या शेजारी तिला तरी कोण आहे आपल्याशिवाय मायेचं.
आईचं बोलणं ऐकून दादा चाटच पडला.
आईचं मन सुगीन जितल व्हत. तिला सांभाळून घ्यायची तयारी दावली व्हती. दादा आईकडे येड्यावानी पाहात व्हता. मला स्वतःला तर लै लै आनंद झाला व्हता. मी तटकन उठून बसलो. आईच्या गळ्याला मिटी मारली. तिचा मुका घेतला आन इचारलं 'आये खरं म्हणते तू? सुगी खरच आपल्या शेजारी राहायला येनार हाये ? ती गाव सोडून जाणार नै ?'
आई हसत दादाकडे पाहत व्हती. दादा लय कानपला व्हता.
मी धुदाट पळत निघालो. सुगीच घर माझ्या पायांनी पाच मिनिटात जवळ केल. मला रातच, अंधाराचं भ्याव वाटल नव्हत.
तिचं दार लोटलेलं व्हतं. हांतुरणावर ती बिचारी रडत बसली व्हती. मी गेलो तसा तिच्या कुशीत शिरलो. मी घाई घाईने तिला सारं सांगितलं-आई काय बोलली ते. आन विचारलं, 'आता नाही जाणार ना गाव सोडून?'
ती रडता-रडता हासली. रडत व्हती, हासत व्हती-दिव्याच्या उजेडात खूप गोड दिसत व्हती. म्या तिचं डोळं पुसलं.
तिनं मला जवळ वडून पोटाशी लावल आन माझे पटा-पटा मुके घ्याया लागली.
(Illustration by Dnyanesh Sonar)
Award-winning short story | September 1984 | Diwali Special







